शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

.... वाढतेयं ‘हॉर्न बजाने की बिमारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 14:51 IST

वाहनचालकांची पुढे जाण्याची घाई आणि काही सेकंद थांबण्याचा नसलेला संयम आणि तरुणाईतील काही जणांकडून एक ‘स्टाईल’ म्हणून वाढत असलेला मोठ्या आवाजाच्या कर्णकर्कश हॉर्नच्या वापरामुळे कोल्हापूर शहरात ‘हॉर्न

ठळक मुद्दे५ आॅक्टोबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायन्स फेस्टिव्हलमध्ये सादर कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा वापर टाळून शहरवासीयांनी राज्याला एक वेगळा आदर्श घालून

- संतोष मिठारी 

वाहनचालकांची पुढे जाण्याची घाई आणि काही सेकंद थांबण्याचा नसलेला संयम आणि तरुणाईतील काही जणांकडून एक ‘स्टाईल’ म्हणून वाढत असलेला मोठ्या आवाजाच्या कर्णकर्कश हॉर्नच्या वापरामुळे कोल्हापूर शहरात ‘हॉर्न बजाने की बिमारी’वाढत आहे. विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. शहरातील विविध ट्रॅफिक सिग्नलवर रेड सिग्नल असताना अवघ्या एका तासात ६ हजार ७२९ अनावश्यक हॉर्न वाजत असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सण-उत्सवात मोठ्या कर्णकर्कश आवाजाच्या साउंड सिस्टीमला गेल्यावर्षीपासून कोल्हापूरकरांनी बगल दिली आहे. यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत अशा कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा वापर टाळून शहरवासीयांनी राज्याला एक वेगळा आदर्श घालून दिला. मात्र, दुसरीकडे काही

वाहनचालकांकडून अनावश्यक हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषणात भर टाकली जात आहे. एक ‘स्टाईल’ म्हणून तरुण वाहनधारक, चालक कर्णकर्कश हॉर्न वापरत आहेत. आपल्या वाहनाला कंपनीचे असणारे हॉर्न हे बिनउपयोगाचे आहेत, या समजातून तरुणाई मोठ्या आणि कर्णकर्कश हॉर्नकडे वळत आहे. दुसरे वाहन अथवा व्यक्ती आपल्या वाहनाच्या आडवे आल्यास त्याला बाजूला करणे हा उद्देश बाजूला ठेऊन इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी विनाकारण कर्णकर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार वाढत आहेत. आपण एकसारखा हॉर्न वाजविल्याने रेड सिग्नल लगेच ग्रीन होत नाही, हे माहीत असून देखील काही वाहनधारक हॉर्न वाजवत राहतात. त्यातून ध्वनिप्रदूषण करून ते एकप्रकारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अशा स्वरूपातील शहरातील वाढती ‘हॉर्न बजानेकी बिमारी’ दूर करण्यासाठी नियमांचे पालन आणि प्रबोधन महत्त्वाचे आहे.सर्वेक्षण काय सांगते?सायबर इन्स्टिट्यूटमधील पर्यावरण व्यवस्थापन विभागातील प्रा. के. डी. आहिरे आणि कार्तिकी हुद्दार, ज्योती तोडकर, संजय रणदिवे, अस्मिता भोसले यांनी आॅक्टोबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात शहरातील विविध परिसरातील बारा ट्रॅफिक सिग्नलवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये त्यांनी एका तासात रेड सिग्नल असताना कितीवेळा अनावश्यक हॉर्न वाजतो त्याची निरीक्षणे नोंदविली. त्यातून या बारा सिग्नलवर एकूण ६ हजार ७२९ इतके हॉर्न रेड सिग्नल असताना जास्तीत जास्त अनावश्यक हॉर्न्स वाजत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित सर्वेक्षण प्रा. आहिरे हे लखनौ येथे दि. ५ आॅक्टोबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायन्स फेस्टिव्हलमध्ये सादर करणार आहेत.पावणे तीन वर्षांत ७२१ जणांवर कारवाईशहरात कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजविणाºया एकूण ७२१ वाहनचालकांवर गेल्या पावणेतीन वर्षांत कारवाई केली आहे. या कारवाईतून एकत्रितपणे ८८ हजार ५०० रुपये इतके तडजोड शुल्काची आकारणी केली असल्याची माहिती शहर पोलीस वाहतूक शाखेकडून देण्यात आली. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण